लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत Ladki Bahin Yojana Patrata

Ladki Bahin Yojana 2024 : महाराष्ट्र सरकारने महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. आता राज्य सरकारकडून महिलांच्या कल्याणासाठी राज्यात लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली आहे. आता ही योजना मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. आता या योजनेमुळे राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध झालेला आहे. पण या योजनेचा लाभ काही महिलांना मिळणार नाही. नेमक्या कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र आहे? याची माहिती जाणून घेऊया..

राज्याच्या अर्थसंकल्पात सगळ्यांचे लक्ष वेधणारी घोषणा म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही घोषणा होय. कारण ही योजना महिलांसाठी खूप महत्वाची मानली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा करता यावी यासाठी राज्य सरकारने या महत्त्वपूर्ण योजनेची घोषणा करण्यात केली आहे.

खुशखबर! ‘या’ कुटुंबांना मिळणार मोफत 3 गॅस सिलिंडर, येथे क्लिक करून पहा या यादीत..

या महिलांना मिळणार नाही 1500 रुपये

(1) ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच

(2) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असेल अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

(3) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी संस्थेत कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.

(4) ज्या कुटुंबाकडे संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

(5) ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता इतर चारचाकी वाहने आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे अशा महिला ‘लाडकी बहिण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.

 

(6) लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाकडून राबविल्या जाणार्‍या आर्थिक योजनेमधून 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.

 

(7) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे अशा परिस्थितीत या महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

 

(8) ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या

बोर्ड / कॉर्पोरेशन/बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/ सदस्य आहेत अशा महिलांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही..

 

पीक कर्ज काढलेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, येथे क्लिक करून पहा बातमी..

 

लाडकी बहिण योजनेसाठी या महिला आहेत पात्र

(1) अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी

 

(2) या योजनेसाठी राज्यातील विवाहित, विधवा आणि घटस्फोटित तसेच परीतक्त्या आणि निराधार महिला पात्र असणार आहेत.

 

(3) ज्या महिलांचे वय 21 ते 60 यादरम्यान असेल त्यांनाच योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 

(4) महिलांचे बॅंकेत खाते (Bank Account) असने आवश्यक आहे..

 

(5) या योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

 

या योजनेचा

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

Leave a Comment